धापेवाडातील पारंपारिक आषाढी उत्सव रद्द

0
17

नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

नागपूर दि. १९ : नागपूर महानगरासह संपूर्ण विदर्भात श्रद्धास्थान असलेल्या श्री. क्षेत्र धापेवाडा येथील आषाढी महोत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या 280 वर्षापासून अखंडितपणे श्री क्षेत्र धापेवाडा येथे मंदिराच्या परंपरेनुसार आषाढीनिमित्त परीपाठाचे कार्यक्रम होत असतात. यासाठी या मंदिराचे अध्यक्ष रुद्रप्रतापसिंह पवार यांनी यावर्षी परवानगी मागितली होती. मात्र कोरोना संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात स्तर ३चे निर्बंध लागू असल्याने सदर परिपाठ कार्यक्रमास परवानगी देता येणार नाही. तसेच यासारख्या इतर धार्मिक कार्यक्रमांना देखील परवानगी देता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी हा उत्सव रद्द झाला हे समजून कोणतीही गर्दी करू नये, प्रशासनाला सहकार्य करावे. घरी रहावे सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अविनाश काकडे यांनी या संदर्भातील निर्देश जारी केले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here