नागपूरात विकलांग,तृतीयपंथी,बेघर नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

0
12

नागपूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, समाजकल्याण विभाग (म.रा.) यांच्या समन्वयाने नागपुरातील तृतीयपंथी समुदायासह विकलांग, बेघर नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सोमवारी (ता.१९) सुरूवात झाली.

खरबी चौकातील बेटियां शक्ती फाऊंडेशन सभागृहामधील लसीकरण केंद्राचा विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., सहायक पोलिस आयुक्त रेखाताई भवरे, किन्नर समुदायाच्या गुरू कल्याणी नायक यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

व्हेरॉयटी चौकातील लता मंगेशकर हॉस्पिटल परिसरात स्थित सारथी ट्रस्टच्या कार्यालयातील लसीकरण केंद्राचा मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, समाजकल्याण तालुका समन्वयक राजेंद्र अवधूत, सारथी ट्रस्टचे अध्यक्ष आनंद चांदराणी, सीईओ निकुंज जोशी, प्रकल्प समन्वयक अमित नगरारे, सामजिक कार्यकर्ता विद्या कांबळे यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

 

#LargestVaccinationDrive #SpecialCamp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here