नागपूर : मनोज ठवकर मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तिघे कर्मचारी निलंबित

0
10

पारडी पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर (Manoj Thawkar) या तरुणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी पीएसआयसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनोज ठवकरच्या घरी भेट दिली होती त्याच्या मृत्यू प्रकरणी आरोपी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत सात जुलैच्या रात्री ही घटना घडली होती. आधी तिघा पोलिसांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. मात्र आता पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

35 वर्षीय मनोज ठवकर हा दिव्यांग होता. मेकॅनिक म्हणून तो नागपुरात काम करत होता. नागपूर शहरातील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात सात जुलैच्या रात्री पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. रात्री साडेआठ-नऊ वाजताच्या सुमारास मनोज या मार्गाने घरी चालला होता. मनोजची दुचाकीही थांबवण्यात आली, मात्र वेळीच ब्रेक न लागल्याने त्याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकली.

मास्क न घातल्यामुळे तीन पोलिसांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here