नागपूर: अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा यांनी कार्यभार स्वीकारला

0
10

नागपूर, ता. १४ : नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून  दीपककुमार मीणा यांनी बुधवारी (ता. १४) पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वीचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांची धुळे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर रिक्त पदावर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केली आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर दीपककुमार मीणा यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. तसेच नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी  मीणा यांची भेट घेतली.

मूळचे राजस्थानचे असलेले दीपककुमार मीणा हे सन २०१३ च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी म्हणून प्रथम नियुक्ती झाली. यानंतर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, त्यानंतर वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले. यानंतर गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आता ते नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार बघतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here