नागपुरात बुधवारी मनपा केन्द्रांमध्ये मर्यादित लसीकरण

0
13

नागपूर, ता.१३ : शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा मर्यादित पुरवठा उपलब्ध झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केन्द्रांवर बुधवारी (१४ जुलै) रोजी १८ वर्षावरील सर्व वयोगटातील नागरिकांचे मर्यादित स्वरुपात लसीकरण होणार आहे, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

तसेच १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दूसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशिनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here