लॉकडाउन मध्ये सूट मिळताच लोकांनी मार्केटमध्ये येणे जाणे सुरु केले याचाच फायदा चोरट्यांनी घेत लोकांचे मोबाईल लंपास करणे सुरू केले आणि नागपूरसह परिसरात गेल्या काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत.
दिवसाला मोबाईल लंपास होण्याचा अनेक तक्रारी पोलिसांना मिळत होत्या पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत मोठी कारवाई केली आणि चोरीला गेलेले हे मोबाईल शोधण्यात नागपूर पोलिसांना मोठं यश आलं आहे.
सायबर पोलिसांनी चोरीला गेलेले 125 मोबाईल परत मिळवले आहेत. 37 लाख रुपये किंमतीचे हे 125 मोबाईल आज लोकांना परत करण्यात आले. नागपूर पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत हे 125 मोबाईल परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने, अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं. मोबाईल परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार मानले.






