डेल्टा प्लस वेरीअंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोविड त्रिसूत्री चे पालन करावे – पालकमंत्री 

0
11

राज्यात कोरोना डेल्टा प्लस वेरीअंट आढळुन आला आहे.जिल्ह्यातील नागरीकांनी भिती बाळगण्याचे कारण नसले तरी कोरोना हा आजारच घातक असल्याने प्रत्येक नागरीकाने कोरोना त्रीसुत्रीचे (मास्क वापरणे, सोशल डिस्टीन्सींग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे) इत्यादींचे कसोशीने पालन करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

दुसरी लाट ओसरली असली तरी नागरिकांनी निर्बंधांचे पालन करावे. प्रशासन लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवत आहे.लसीकरणासोबत सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संशयितांच्या तपासण्याची संख्या वाढविण्यात येत असून ज्याही नागरीकांना कोरोनाची लक्षणे जाणवतील त्यांनी तातडीने आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी व कोविडपासून आपला बचाव करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राऊत यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here