दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम: शिक्षामंत्री वर्षा गायकवाड

0
8

सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी, किंवा कशी घ्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला यावेळी त्यांनी दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे असे सांगितले

दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर परिणाम होत आहे. आमची बाजू न्यायालयासमोर मांडणार आहोत. सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती असाधारण परिस्थिती आहे. इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे. मुंबई हायकोर्ट सहानुभूतीनं निर्णय घेईल. बारावीच्या परीक्षा महिनाभरानंतर घ्याव्या, अशी विनंती केंद्राला करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

अकरावी प्रवेशासंदर्भात विचारविमर्श सुरु

अकरावी प्रवेशासंदर्भात चर्चा सुरु आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे आमची प्राथमिकता आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रश्नांबाबत तज्ज्ञांची चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here