मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दौऱ्याचा वेग चक्रीवादळाला लाजवणारा :मनसे

0
9

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता,आता मात्र मनसेने उद्धव ठाकरे यांच्या या धावत्या भेटीवर टीकास्त्र सोडले आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता. ते खरंच देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत, अशी खोचक टिप्पणी मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली आहे. मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे

मुख्यमंत्र्यांनी विमानतळापासून मोजून 10 किलोमीटर अंतरावरील भागांची पाहणी केली,आतमध्ये जाऊन कुठल्याही गावाला भेट दिली नाही असे सांगत विरोधकांनी हल्लाबोल केला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here