बीड – भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं होतं. आज, त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली.
मी कोरोना पॉझिटीव्ह झाले असून अगोदरच विलीकरणात आहे, कोरोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेन. माझ्या समवेत दौऱ्यात असणार्यांनी टेस्ट करून घ्यावी, काळजी घ्यावी, असे ट्विट पंकजा यांनी केलं आहे. पंकजा यांच्या ट्विटनंतर कार्यकर्त्यांनी त्यांना काळजी घ्या आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांच्या ट्विटवर अनेकांना तशा कमेंट केल्या आहेत.






