सिमूनतला येथील मुरूम खदानाची अवैद्य रित्या उत्खनन करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करा.. ; सिमूनतला, शमनगर, नेताजी नगर, घोट, पेटतळा, मंजेगाव, ठाकूर नगर, येथील ग्रामस्थांची मागणी..

0
6
Oplus_131072

चामोर्शी / घोट :- चामोर्शी तालुक्यातील घोट जवळील सिमुनतला येथील महादेव मंदिराजवळ असलेल्या मुरूम खदानाची हजारो ब्रास अवैद्य उत्खनन करून संबंधित ठेकेदाराने (मुरुम)मालवाहतूक केला असून संबंधित ठेकेदारावर योग्य चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी घोट परिसरातील जवळच असलेल्या सिमुनतला, शमनगर, नेताजी नगर, घोट, पेटतळा, मंजेगाव, ठाकूर नगर या गावातील ग्रामस्थांनी सदर मागणी केलेली आहे.

सदर गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठेकेदाराला मुरुम खदानची रॉयल्टी 200 ब्रास असताना सुद्धा 1000 ( हजार ) ब्रासची अवैध मुरुम उत्खनन कसे काय केले अशी विचारणा सुद्धा गावकऱ्यांनी महसूल विभागाला केली आहे.

अशा अवैद्य मुरूम उत्खननामुळे “शासनाचा कर “बुडालेला आहे. महसूल विभागाचे मोठे नुकसान तर होतच आहे. परंतु या घोट, (सिमुनतला) परिसरातील सिमुनतला येथील महादेव मंदिराजवळ असलेल्या मुरूम खदानीला सबंधित ठेकेदाराने गिळंकृत झाल्याचे दिसून येत आहे. याच कारणामुळे या परिसरातील गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

संबंधित ठेकेदाराची योग्य चौकशी करून कारवाई न झाल्यास संबंधित गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करून मूर्माचे उत्खनन बंद करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here