126 दिव्यांगांना अंत्योदय कार्डचे वाटप

0
22

गडचिरोली: दिव्यांग संघटना गडचिरोलीच्या वतीने मार्गदर्शन मेळवा आणि अंतोदय कार्ड वितरण कार्यक्रम गडचिरोली पंचायत समितीच्या क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके सभागृहामध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विकलांग व्यक्तीचे अधिकार विषय समन्वय संगीता तुमडे, वैशाली आंबेकर, निरीक्षण अधिकारी तहसील कार्यालय गडचिरोली, मीनल बावणे, घरकुल विभाग प्रमुख, मा. अर्चना जनगणवार, सामाजिक कार्यकर्त्या गडचिरोली. तुळशी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष, तुळशीदास पुडके, यांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनामध्ये कार्यक्रम पार पडले, यामध्ये मॅडमनी मागच्या महिन्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना आश्वासन पूर्ण सांगितले की, पुढच्या महिन्यापर्येंत जेवढे दिव्यांग व्यक्तीचे अंतोदय कार्ड मला बनविता येईल तेवढे बनविण्याचा प्रयत्न करतो अशी ग्वाई दिली होती. त्यांनी आपल्या शब्दाला कर्तुत्वाची जोड देत. दिलेल्या शब्दाला घेऊन १२६ अंतोदय कार्ड बनवून दिव्यांग व्यक्तीला स्वस्त धान्याची सोय केली. त्याबद्दल तुळशी दिव्यांग संघटनेने दिव्यांग व्यक्ती बद्दलची आत्मियता, संवेदनशिलता याचे कौतुक आणि कृज्ञनता व्यक्त करीत सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजना मिळविण्यात येणाऱ्या अडचणी लागणारे कागदपत्र याबद्दल माहिती दिली. दिव्यांग दिव्यांग व्यक्तीने शासकीय कामाला येताना निसंकोचपणे येऊन आपले काम करावे किंवा संबधित विभागासोबत संवाद करून घ्यावे. शासन यंत्रणा आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहे. असे आश्वासन देत मॅडमने उपस्थित दिव्यांग व्यक्तीला मार्गदर्शन केले, संघटना दिव्यांग व्यक्तीसाठी आधार आणि खूप मोठा पाठबळ आहे, जे काही कार्ड आपल्याला मिळाले हे संघटनेमुळे आणि त्यांच्या मागनीमुळे असेही उपस्थिताना सांगितले. दिव्यांग व्यक्तीला संघटनेचे महत्व, संघटनेला जोडण्याने होणारे फायदे, संघटना दिव्यांग व्यक्तीसाठी खूप मोठा पाठबळ आहे, संघटनेची जो धरील कास. त्याचा सुटेल हतबल होण्यापासून फास, संघटना गरजेला धावून जातोय आणि एकोप्याने राहून मदत करतो. संघटना नसती तर १२६ लोकांना कार्ड वाटप झाले नसते. म्हणून संघटना उभी आणि प्रबळ करा आणि एकजुटीने असलेल्या शासकीय योजनेचा लाभ घ्यावे असे आवाहन कार्यक्रमाच्या निमित्याने करण्यात आले. तुळशी दिव्यांग संघटना २०१९ पासून गडचिरोली तालुक्यामध्ये दिव्यांग व्यक्तीच्या प्रश्नावर काम करीत आहे. ही संघटना आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली आहे, प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेला गडचिरोली पंचायत समितीच्या क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके सभागृहामध्ये मासिक मिटिंग होते. या मिटींगला प्रत्येक महिन्याला तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांला बोलावून त्यांचे मार्गदर्शन घेणे आणि आपल्या समस्या अडचणी त्यांच्या पर्यंत पोहचविणे अशा अनुषंगाने दिव्यांग संघटनेची मिटिंग घेण्यात येते. या संघटनेच्या मिटिंगमध्ये दिव्यांग व्यक्तीच्या प्रश्नावर चर्चा करून संबधित विभागासोबत समन्वय साधला जातो आणि प्रश्नाचा निवारण करण्यात येतो, संघटनेच्या मासिक मिटिंगसाठी पंचायत समितीने नेहमीसाठी सभागृह उपलब्ध करून देत असतो म्हणून दिव्यांग व्यक्तींना मुद्दे शोधून त्यावर चर्चा करायला संधी मिळतो, त्यासाठी पंचयत समितीचे आभार. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू कुमरे,चांगुणा, वैशाली मोहुर्ले, अनेक सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here