माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य सुगंधा उईके यांची तक्रार चातगाव पोलीस मदत केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक यांचेवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा.

0
45

गडचिरोली:-धानोरा तालुक्यातील मिचगाव येथील पोलीस पाटील यांच्या खोट्या तक्रारीवरून सुगंधा उईके यांचा मुलगा चातगाव येथील पोलीस मदत केंद्र येथे बोलावण्यात आले त्यामुळे आपल्या मुलाला घेऊन स्वतः सुगंधा उईके ह्या चातगाव येथील पोलीस मदत केंद्रात हजर झाल्या परंतु पोलीस उपनिरीक्षकांनी घटनेची शहानिशा न करता पोलीस पाटील यांच्या सांगण्यावरून विनोद याला आईच्या समोरच मारहाण केल्याने उपस्थित असलेल्या सुगंधा उईके यांनी पोलीस उपनिरीक्षकांना माझ्या मुलाला का मारता म्हणून विचारणा केली असता त्यांनी सुगंधा उईकें यांचे सुद्धा केस पकडून भिंतीला आपटले व ओढत नेले तसेच अर्वाच्या शब्दात तसेच जातीवाचक शिवीगाळ करून कायम जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली तसेच जास्त करशील तर गावात येऊन तुझे कपडे काढून लग्न करून तुला गावकऱ्यांसमोर मारणार असे बोलले त्यामुळे घाबरलेल्या सुगंधा आबाजी उईके यांनी पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याकडे तक्रार करून संबंधित पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा(ॲट्रॉसिटी ) अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित पोलीस उपनिरीक्षकांना सेवेतून बडतर्फ करावे अशी तक्रार केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here