करोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेण्याचं वाढदिवसानिमित्त सचिनचं चाहत्यांना आवाहन

0
10

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज ४८ वा वाढदिवस आहे.नुकताच करोनावर मात करुन घरी परतलेल्या सचिननं चाहत्यांना ट्विटरच्या माध्यमातून खास विनंती केली आहे.

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो. मागचा महिना माझ्यासाठी खूप अडचणीचा होता. करोना पॉझिटीव्ह असल्याने २१ दिवस आयसोलेशनमध्ये होतो. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे आणि डॉक्टरांनी घेतलेल्या काळजीमुळे मी करोनावर मात केली. या दरम्यान मला डॉक्टरांनी एक विनंती केली. ती विनंती मी तुम्हा सर्वांना करत आहे. गेल्या वर्षी मी प्लाझ्मा डोनेशन केंद्राचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी त्यांनी एक संदेश दिला होता. जर प्लाझ्मा योग्य वेळेत डोनेट केला तर रुग्ण लवकर बरा होतो. जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी प्लाझ्मा डोनेट करणार आहे.याबाबत मी डॉक्टरांशी बोलत आहे.तुम्हीही करोनावर मात करुन बरे झाला असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि प्लाझ्मा डोनेट करा. यामुळे खूप अडचणी दूर होतील. त्यामुळे माझी मनापासून विनंती आहे की, रक्तदान करा आणि रुग्णांचे जीव वाचवा’, अशी विनंती सचिननं  शेअर केलेल्या व्हिडिओत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here