“ऑक्सिजन कधी विमानाने आणता येतो का? हे मला काही कळतच नाही. तो महाराष्ट्रात निर्माण करावा लागेल. मात्र मुख्यमंत्री हे एका पक्षाचे प्रमुख होण्यासाठी जन्माला आलेत. मात्र, पवार साहेबांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री केलंय. पूर्वीच्या काळात राजे ज्या पद्धतीने वेष बदलून जनतेत फिरत होते तसं उद्धव ठाकरे यांनी पीपीई किट घालून फिरलं पाहिजे. त्याशिवाय त्यांना जनतेचे प्रश्न कळणार नाहीत.”असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आता सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
लवकरात लवकर ऑक्सिजन मिळावा. म्हणून हवाई दलाने वाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. वायू सेने च्या C-17 आणि IL-76 विमानांचा वापर यासाठी केला जात आहे. यामुळे देशाच्या मोठ मोठ्या शहरांमध्ये विमानाने ऑक्सिजन पुरवला जाणार आहे.






