नागपूर दिनांक 3 ऑक्टोबर ( शहर प्रतिनिधी )
“दसरा” दिनानिमित्त बुधवार दिनांक 05 ऑक्टोंबर, 2022 ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या मंजुर ठराव नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे.
त्यानुसार बुधवार दिनांक 05 ऑक्टोंबर, 2022 ला “दसरा” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन यांनी निर्गमीत केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.






