नागपूर दिनांक 3 सितंबर ( महानगर प्रतिनिधी)
o पश्चिम महाराष्ट्रातील तिसरे ईव्ही एक्स्पिरिएन्स स्टोअर जिथे अनुभवता येणार २० हून अधिक ब्रॅण्ड्स
o २०२३ पर्यंत भारतभरात १०० हून अधिक ईव्ही एक्स्पिरिएन्स स्टोअर्स सुरू करण्याची ब्रॅण्डची महत्त्वाकांक्षी योजना
भारताच्या सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या मल्टि-ब्रॅण्ड ईव्ही प्लॅटफॉर्म Blive ने आज नागपूरमधील आपल्या दुसऱ्या मल्टि-ब्रॅण्ड एक्स्पिरिएन्स स्टोअरच्या उद्घाटनाची घोषणा केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी या स्टोअरचे उद्घाटन केले. या स्टोअरमध्ये उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असणार आहे तसेच प्रांतातील ईव्ही ग्राहकांना थेट सहाय्य पुरविले जाणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांवर अधिकाधिक भर दिला जात असताना ग्राहकांना अशाप्रकारच्या विविध वाहनांचे उपलब्ध पर्याय अनुभवण्याची संधी मिळणे महत्त्वाचे आहे. नव्या स्टोअरमध्ये एक कंपनीचे स्व-निर्मित क्विक सर्व्हिस किऑस्क, बॅटरी बदलण्याची सुविधा आणि ईव्ही चार्जिंगची सोय असणार आहे. याखेरीज हे स्टोअर ब्रॅण्ड्ससाठीचे ग्राहक अनुभव केंद्रही असेल. राज्यातील हे चौथे Blive स्टोअर आहे. याआधीची दोन स्टोअर्स नागपूरमध्ये तर एक पुण्यामध्ये उघडण्यात आले आहे.
आपल्या आगळ्यावेगळ्या ओम्नी चॅनल अर्थात सर्व माध्यमांमध्ये कार्यरत मंचाद्वारे भारतीय ब्रॅण्ड्सनी तयार केलेल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स (e2Ws) आणि इलेक्ट्रिक बायसिकल्स (ई-बाइक्स) चे 20 हून अधिक ब्रॅण्ड्स प्रदर्शनार्थ मांडून आपल्या सर्व ग्राहकांना या वाहनांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी पुरविणे हे BLive चे उद्दीष्ट आहे. हे स्टोअर सुरू करून E2W शी निगडित सर्व गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची कंपनीची इच्छा आहे.
सर्व BLive स्टोअर्समध्ये सध्या कायनेटिक ग्रीन, टेक्नो इलेक्ट्रा, गेमोपाई, BattRE, एलएमएल – डेटेल, ई-मोटोरॅड, हीरो इलेक्ट्रिक आणि इतर महत्त्वाच्या ब्रॅण्ड्सपासून ते चार्जिंग सुविधा आणि पोस्ट सेल्स सर्व्हिस पॅकेजेसही उपलब्ध आहेत. या एक्स्पिरिएन्स स्टोअर्सच्या माध्यमातून BLive ने एक अनोखा फिजिटल अनुभव उपलब्ध करून दिला आहे, जेणेकरून ग्राहकांना खरेदी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यापूर्वी त्यांचा अनुभव घेता यावा व त्याविषयी जाणून घेता यावे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना BLive चे सीईओ आणि सह-संस्थापक समर्थ खोलकर म्हणाले, “नितिन गडकरी यांच्या हस्ते आमच्या नागपूर स्टोअरचे उद्घाटन होत आहे हे आमचे भाग्य आहे. EV in every home in India, अर्थात भारताच्या घराघरात इव्ही पोहोचविण्याच्या आमच्या ध्येयाला यामुळे प्रचंड बळ मिळाले आहे. या मल्टि-ब्रॅण्ड इव्ही एक्स्पिरिएन्स स्टोअरच्या उद्घाटनाद्वारे इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय अधिकाधिक लोकांकडून स्वीकारला जाण्यास गती मिळावी यादृष्टीने BLive चे काम सुरू आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात काम करताना Blive एक सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगून आहे; तफावती भरून काढण्याचे काम करत आहे आणि ग्राहकांच्या सर्व गरजा पुरविल्या जातील असे वन-स्टॉप शॉप उभारत आहे. BLive एक्स्पिरिएन्स स्टोअर्स लवकरच भारतभरातील १०० हून अधिक ठिकाणी कार्यरत होतील व त्यामुळे ग्राहकांना आपल्या पसंतीच्या ईव्हीचा अनुभव घेता येईल व खरेदी करता येईल.”
नागपूरमध्ये सुरू झालेल्या या नव्या स्टोअरच्या माध्यमातून हरित तंत्रज्ञान ग्राहकांच्या अधिक जवळ नेण्याचे काम BLive करत आहे. या कामाच्या माध्यमातून BLive कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या जागतिक ध्येयधोरणामध्ये सामील झाले आहे. हे स्टोअर ग्राहकांना ईव्हीचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देतेच पण त्याचबरोबर त्यांना विविध ब्रॅण्ड्स आणि डिझाइन्सचे पर्यायही देऊ करते, जेणेकरून त्यांना आपल्या सोयीनुसार विद्युतवाहन निवडता यावे.
याखेरीज या स्टोअरद्वारे विस्तारित आफ्टर सेल्स ईव्ही केअर सेवाही पुरविली जाईल. यात रस्त्यावर गाडी बंद पडल्यास मदत मिळणे, पैसे भरण्याचे सुलभ पर्याय, सर्वसमावेशक सर्व्हिस पॅकेज आणि ई-वाहनांचे सुटे भाग अशा सर्व गोष्टींचा या सेवेमध्ये समावेश आहे.
या भागीदारीबद्दल बोलताना EAZY RIDE चे बुर्हानुद्दीन अली म्हणाले, “आम्ही अत्यंत भारावून गेलो आहोत आणि BLive शी केलेल्या भागीदारीविषयी उत्साहित आहोत. इलेक्ट्रिक वाहने भारतात हळूहळू लोकप्रिय होऊ लागली आहेत आणि या भागीदारीमुळे या ईव्ही लाटेचा भाग बनण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. शिवाय हे मल्टि ब्रॅण्ड स्टोअर असल्याने आम्हाला आमच्या ग्राहकांना अधिक उत्पादने आणि त्याचा आगळावेगळा अनुभव देण्याची संधीही मिळाली आहे.”
यानंतर सुरुवातीला दक्षिण आणि पश्चिम भारतात इव्ही एक्स्पिरिएन्स स्टोअर्स सुरू करण्यावर BLive कडून भर दिला जाणार आहे. द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये ग्राहकांना फारसे पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना पारंपरिक वाहनांच्या ऐवजी पर्यावरणस्नेही वाहनांचा स्वीकार करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात. अशा शहरांमध्ये अधिक खोलवर शिरण्यासाठी प्रयत्न करण्याचीही BLive ची योजना असून त्यादृष्टीने देशभरात फ्रँचायझी तत्त्वावर अधिक स्टोअर्स उघडण्यासाठी कंपनी आणखी स्टोअर पार्टनर्सच्या शोधात आहे.






