नागपुरात दुचाकी वाहनाकरीता नवीन मालिका सुरु

0
7

नागपूर दिनांक 23 ऑगस्ट ( शहर प्रतिनिधी)

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर (पूर्व) येथे दुचाकी वाहनाचा MH49-BV ही नोंदणी क्रमाकांची मालिका संपत असल्याने नवीन दुचाकी वाहनांकरीता MH49-BX अशी नवीन मालिका 25 ऑगस्ट पासून सुरु करण्यात येत आहे.

नागरिकांना वाहनाकरीता पसंतीचा क्रमांक घ्यावयाचा असल्यास वा आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज पत्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅनकार्ड व पसंतीचा नोंदणी क्रमांकासाठीच्या उप प्रादेशिक परिवहन अधीकारी, नागपूर (पूर्व) यांचे नावे काढलेल्या फीच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासहीत कार्यालयात स्वत: (नविन वाहन नोंदणी विभाग) येथे 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.30 या कालावधीत सादर करावेत.

(दुपारी 2.30 नंतर तसेच दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमाने अर्ज स्वीकारले जाणार नाही), असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (पूर्व) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here