श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद

0
14

नागपूर दिनांक 17 ऑगस्ट (प्रतिनिधी)

श्रीकृष्ण जयंती (जन्माष्टमी) दिनानिमित्त गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट 2022 ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त नागपूर यांच्या निर्देशनानुसार शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे.

त्यानुसार गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट 2022 ला “श्रीकृष्ण जयंती” (जन्माष्टमी) दिनानिमित्त नागपूर महानगरपालिा हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील.

या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन यांनी निर्गमीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here