स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्य सैनिकांना विनामुल्य बस सेवा उपलब्ध

0
8

नागपूर दिनांक 10 ऑगस्ट ( महानगर प्रतिनिधी)

स्वातंत्र्य दिनाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना विनामुल्य बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय बससेवा, मोरभवन, सीताबर्डी तसेच महाराजबाग येथून सकाळी ८.१५ वाजता विभागीय कार्यालय व परत १०.०५ वाजता अशी उपलब्ध करण्यात आलेली आहे.

तसेच सायंकाळी ५.०० वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असल्याने या ठिकाणी सुद्धा दिलेल्या वेळेच्या अगोदर व परतीकरीता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here