नागपूर दिनांक १४ जुलाई ( महानगर प्रतिनिधी )
मागील तीन-चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये नागपूरकरांना भेडसावणा-या समस्यांवर दिलासा मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन प्राधान्याने कार्य करीत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे.
मनपाकडे विविध माध्यमातून प्राप्त होणा-या तक्रारींवर तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्यात येत आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाचे जवान शहरात सर्वत्र सेवाकार्य बजावत आहेत.
बुधवारी १३ जुलै रोजी झाड पडण्याबाबत धरमपेठ झोन अंतर्गत जी.पी.ओ. चौक ते राजा राणी चौक या रोडवर, हिस्लॉप कॉलेज जवळ रोडवर आणि जुने आर.बी.आय. रामदासपेठ कॅनल रोड, संविधान चौकामध्ये, लक्ष्मीनगर झोन अंतर्गत आर.पी.टी.एस. रोडवरील जेरील लॉन जवळ, धंतोली झोन अंतर्गत काही ठिकाणाहून तक्रार प्राप्त झाली.
संबंधित झोन पथकाद्वारे तात्काळ सेवाकार्य बजावले व रस्ता मोकळा करण्यात आला. याशिवाय मस्कासाथ येथील माधव लीला कॉम्प्लेक्स जवळ पक्षी अडकल्याची तक्रार प्राप्त झाली. यावर पक्ष्याला सुखरूप बाहेर काढून लकडगंज झोन पथकाद्वारे जीवनदान देण्यात आले.
पाणी साचण्याबाबत लकडगंज झोन अंतर्गत कळमना मिल कॅन्सर हॉस्पीटल, गिट्री लेआउट गोधनी रोड पांडुरंग मंगल कार्यालयाजवळ, ओम साईनगर प्रेम नगर येथे शैलेश राठोड यांच्या घरी, आदर्श कॉलनी प्लॉट नं. १० नारा येथे घरामध्ये, कळमना पोलिस स्टेशनपासून १ किमी अंतरावरील न्यू केमर स्कूल जवळ वाजरामध्ये, अजनी चौक क्लॉक टॉवर कम्पाउंडमध्ये, त्रिमूर्ती नगर भाउसाहेब सुरके नगर प्लाट नं. ११९ मधील बेसमेंटमध्ये, दीनदयाल नगर वस्तीमध्ये, काटोल रोड दीपक मदान जवळ, मनिष नगर अंडर ब्रिजमध्ये, ओम साई नगर कोराडी रोड, झाशी राणी चौकात, प्लॉट क्र. १९ दीपक नगर, काटोल रोड येथील तक्रार प्राप्त झाली.
अग्निशमन पथकाद्वारे हॉस्पीटलमध्ये जमा पाणी काढण्याची कार्यवाही करण्यात आली. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत नाका नं. १० जवळ रस्त्यावर खड्डा पडून पाणी साचले व धंतोली झोन अंतर्गत गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स येथे खड्डा पडून पाणी साचल्याची तक्रार प्राप्त झाली. यावरही झोन पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली.
झोननिहाय २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष
अ.क्र. झोनचे नाव संपर्क क्रमांक
१ लक्ष्मीनगर 2245833/2245028
२ धरमपेठ 2567056/2565589
३ हनुमाननगर 2755589
४ धंतोली 2958401/2958400
५ नेहरूनगर 2700090/2702126
६ गांधीबाग 2735599
७ सतरंजीपुरा मो. 7030577650
८ लकडगंज 2737599/2739020
९ आशीनगर 2655605/2655603
१० मंगळवारी 2596903






