विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा : देवेंद्र फडणवीस

0
17

महाराष्ट्र दिनांक 2 जुलै ( प्रतिनिधी)

राज्यात सन २०२४मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  भाजपच्या आमदारांना केले.

राज्यात आपले सरकार आले असून कोणीही नाराज होऊ नका, सर्वांची कामे मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचे समजते.

मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या आमदारांच्या बैठकीत फडणवीसांनी हे आदेश दिले. पुढच्या अडीच वर्षांत रखडलेली सर्व कामे मार्गी लावूया. कोणीही कसलीही काळजी करू नका आणि आता सर्वांनी जनतेच्या कामासाठी लागा, असेही ते म्हणाले.

राज्यात आपले सरकार असले तरी अडीच वर्षांनी येणाऱ्या २०२४च्या विधानसभा निवडणुकीची आतापासून तयारी सुरू करा आणि या निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळवून देण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावा, अशी सूचना त्यांनी या बैठकीत दिल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here