नवी दिल्ली दिनांक 29 जून ( प्रतिनिधी)
चोहोबाजूने संकटाने घेरलेल्या ठाकरे सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे उद्याच ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावं लागणार आहे.
कोर्टाच्या या निर्णयानंतर ठाकरे सरकार आता उद्या बहुमत सिद्ध करणार की मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे मुख्यप्रतोद सुनील प्रभू यांनी कोर्टात याचिका दाखल करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्यास ठाकरे सरकारला सांगितलं आहे.
राज्यपालांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यावर कोर्टात सुनावणी झाली असता ठाकरे सरकारच्या विरोधात निकाल गेला. परिणामी सरकारला बहुमत सिद्ध करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.






