10 वी चा निकाल जाहीर,नागपूर बोर्ड राज्यात चौथ्या क्रमांकावर

0
10

महाराष्ट्र दिनांक 17 जून ( प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.

दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वात जास्त निकाल लागला आहे.

राज्यात 8 माध्यमांसाठी परिक्षा झाली. राज्यातील पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, आैरंगाबाद, लातूर, नाशिक व कोकण या 9 विभागातून 15 लाख 84 हजार 790 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 68 हजार 977 परिक्षेला बसले होते. तर 15 लाख 21 हजार 003 उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णची टक्केवारी 96.94 अशी आहे.

नागपुर बोर्ड राज्यातून चौथ्या क्रमांकावर आला असून नागपूर बोर्डाचा 97 टक्के विद्यार्थी पास झाले असून यातही मुलींनी बाजी मारली आहे

 

*विभागनिहाय टक्केवारी*

कोकण विभाग – ९९.२७टक्के

कोल्हापूर विभाग – ९८.५०टक्के

लातूर विभाग – ९७.२७टक्के

नागपूर विभाग -९७ टक्के

पुणे विभाग – ९६.९६टक्के

औरंगाबाद विभाग – ९६.३३टक्के

मुंबई विभाग – ९६.९४टक्के

अमरावती विभाग -९६.८१ टक्के

नाशिक विभाग – ९५.९०टक्के

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here