मनपा निवडणूक आरक्षणाबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध

0
15

नागपूर दिनांक 13 जून ( महानगर प्रतिनिधी)

नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण 31 मे रोजी जाहिर झाले.

आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना मागविल्यानंतर सोमवारी १३ जून रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांनी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली.

१२ मे रोजी निवडणूक आयोगाद्वारे प्रभाग रचनेचे अंतिम प्रारूप मंजुर करण्यात आले. त्यानंतर ३१ मे रोजी प्रभागांच्या आरक्षणाची ईश्वरचिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. यानंतर १ जून ६ जून पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. २०११च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४,४७,४९४ एवढी असून यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,८०,७५९ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १,८८,४४४ एवढी आहे. नागपूर शहराची ५२ प्रभागामध्ये विभागणी करून त्रिस्तरीय प्रभागरचना करण्यात आली आहे.

त्यानुसार एकूण सदस्यसंख्या १५६ एवढी आहे. यापैकी ५० टक्के अर्थात ७८ जागा महिलांसाठी राखीव ठरलेल्या आहेत. अनुसूचित जातीकरिता एकूण ३१ जागा आरक्षित असून त्यातील १६ जागा महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत. अनुसूचित जमातीकरीता १२ जागा राखीव असून त्यापैकी ६ जागा महिलांकरिता राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 113 जागा असून त्यातील 56 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here