बंग कनिष्ठ महाविद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

0
16

हिंगणा दिनांक 10 जून ( प्रतिनिधी)

स्वर्गीय देवकी बाई बंग कनिष्ठ महाविद्यालय हिंगणा येथील विद्यार्थ्यांनी विद्यालयाची मागील अनेक वर्षाची शंभर टक्के निकालाची परंपरा या वर्षीही कायम ठेवली.

सत्र 2021-22 मधील वर्ग 12 वीत विज्ञान व वाणिज्य शाखेचे 168 विध्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील सर्वच विद्यार्थी पास झाले कनिष्ठ महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून प्रथम पूजा बुरहान-83.17% व्दितीय अर्शिया शेख-८२.३३% तृतीय कशिश आष्टनकर-81% यांनी तर विज्ञान शाखेतून प्रथम पायल अंबुले -81.50% व्दितीय खुशाली लटारे-७७.१७% तर

आयुष मिश्रा-74.83% टक्के मार्क घेउन तृतीय क्रमांक पटकावला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग, संचालक मा महेश बंग, संचालिका सौ अरूणा बंग व प्राचार्य नितीन तुपेकर यांनी कौतुक केले व पुढील भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, व शिक्षक वृंद यांना दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here