महाराष्ट्रात 15 जून पासूनच शाळा उघडतील,मास्क..: शिक्षामंत्री वर्षा गायकवाड

0
15

महाराष्ट्र दिनांक 6 जून ( प्रतिनिधी)

राज्यातील शाळा १५ जूनलाच सुरु होतील. तसेच विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक असणार नाहीत, असं शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. (Schools in Maharashtra will start on June 15 Masks not Mandatory for Students)

मंत्री गायकवाड म्हणाल्या, आम्ही कोविडच्या स्थितीचा आढावा घेत आहोत. पण कोविडच्या योग्य नियमावलींसह आम्ही १५ जून रोजी शाळा सुरु करणार आहेत. शाळेत येताना विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक असणार नाही. यापार्श्वभूमीवर नव्या एसओपीज जाहीर करण्यात येतील. तसेच पुढील निर्णय हे परिस्थिती पाहुन घेतले जातील, असंही शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचाही प्रश्न आहे. लसीकरण वाढवण्याबाबत टास्क फोर्सशी सल्ला घेण्यात येईल, असे गायकवाड यांनी काल म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here