नागपूर दिनांक 31 मई ( महानगर प्रतिनिधी)
कांग्रेस प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी उत्तर प्रदेशमध्ये डिपॉझिट जप्त झालेल्या इम्रान खान उर्फ प्रतापगडी यांना काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल नाराज व्यक्त केली. तसेच माजी आमदार डॉ. अशिष देशमुख यांनी आपल्या काँग्रेस प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा देण्याचं जाहीर केलं.
उत्तर प्रदेशातून काँग्रेसचे केवळ दोन आमदार निवडून आले. अशा राज्यातून प्रतापगडी, राजीव शुक्ला आणि प्रमोद तिवारी अशा तीन नेत्यांना राज्यसभेवर पाठवणे हे कितपत योग्य आहे असा सवालही आशिष देशमुख यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्ष श्रेष्टींच्या अशा प्रकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात मी महासचिव पदाचा राजीनामा देत आहे असे मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.
आशिष देशमुख म्हणाले, “मी माझ्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. महाराष्ट्रात अतिशय कर्तबगार आणि काँग्रेसला रिझल्ट देऊ शकतात असे नेते उपलब्ध आहेत. असं असताना एका बाहेरील उत्तर प्रदेशच्या व्यक्तीला इम्रान खान उर्फ इम्रान प्रतापगडी या नवख्या व्यक्तीला महाराष्ट्रात लादण्यात आलंय. त्यांना काँग्रेसच्या वतीने राज्यसभेची उमदेवारी देण्यात आलीय. या निर्णयाच्या निषेधार्थ मी माझ्या महासचिव पदाचा राजीनामा देत आहे.”
“मी राजीनामा देत असलो तरी काँग्रेसमध्ये राहणार आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातूनच जनतेची सेवा करणार आहे,” असंही आशिष देशमुख यांनी नमूद केलं.






