फडणवीस यांनी मला सल्ला द्यायची गरज नाही, त्यांनी केंद्राला सल्ला द्यावा :शिवसेना आमदार संजय गायकवाड

0
13

मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शनिवारी केले होते. गायकवाड यांची उतरली नसल्याने त्यांनी अश्लील भाषेत टीका केलीय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर संजय गायकवाड यांनी पलटवार केलाय.आमदार गायकवाड यांनी फडणवीस यांनाच खडे बोल सुनावले असून मला सल्ला द्यायची गरज नाही, त्यांनी केंद्राला सल्ला द्यावा. फडणवीस यांनाच तळीराम पाळायची सवय असून लेडीज बारमध्ये त्यांच्या जवळचे मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जातात,असा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय.

नितेश राणेवरही टिका

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपचा चांगलाच समाचार घेतला. शिवाय नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटवर गायकवाड यांनी टीका करत नितेश राणेंला बेडुक म्हटलं. उद्धव ठाकरेंवर टीका करायला चालते. मुख्यमंत्र्यांवर टीका करतात मग आम्ही त्यांची पूजा करायची का?, असा सवाल संजय गायकवाड यांनी केला. नितेश राणेंचा फोनही डायल केला होता मात्र बोलणे झाले नाही, असं गायकवाड म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here