14 मे रोजी घेणार पोलखोल सभा: देवेंद्र फडणवीस

0
9

महाराष्ट्र दिनांक 2 मे ( प्रतिनिधी)

मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत अल्टिमेटम दिल्यावर तुम्ही घाबरलात आणि म्हणे बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा आम्ही तिथे होतो. शिवसेनेचा एकही नेता तेथे नव्हता. आमच्या ३२ नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. मी स्वतः तेथे उपस्थित होतो. बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये १८ दिवस होतो, असे सांगत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईतील सोमय्या मैदानात भाजपच्या बुस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

काही जणांना वाटते, ते म्हणजेच महाराष्ट्र आहे, त्यांचा अपमान, मान-सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा मान-सन्मान, अवमान झाला. असे अजिबात नाही. महाराष्ट्रातील १८ पगड जातीच्या लोकांनी हा महाराष्ट्र घडवला आहे, समृद्ध केला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच १४ मे रोजी पोलखोल सभा घेणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

ते हिंदू नाहीत, असे म्हणून मला हिंदुत्वाची संख्या कमी करायची नाही. हिंदुत्वही आचरण पद्धती आहे, असे सांगतानाच तुमचे सवंगडी जेलमध्ये जातात आणि तरीही ते पदावर असतात, अशावेळी महाराष्ट्राची देशात बदनामी होते, अशी टीका फडणवीस यांनी केली. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा आमचे नेते आणि मी स्वतः तेथे होतो. शिवसेनेचा कोणता नेता तेथे होता, हे सांगावे, असे सांगत त्या घटनेवरून फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच फैलावर घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here