नागपूरात आरटीपीसीआर चाचण्या तातडीने व्हाव्यात यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘स्पाईस जेट (हेल्थ)’चे मालक अजय सिंह यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करून आरटीपीसीआर टेस्टसाठी नागपूरला दोन मोबाईल चाचणी लॅब देण्याची विनंती केली.
‘स्पाईस हेल्थ’ने ही विनंती मान्य करत मोबाईल टेस्ट लॅब ताबडतोब नागपूरला पोहचवण्याचे आश्वासन दिले आहे. या एका लॅबमध्ये ३५० रुपयांत प्रति व्यक्ति प्रमाणे प्रति दिन ३००० लोकांच्या टेस्ट करता येऊ शकतील






