वर्धा येथे महिला वकीलावर चाकू हल्याचा डीबीए तर्फे पायी मार्च काढून निषेध आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
9

नागपूर दिनांक 24 मार्च (महानगर प्रतिनिधी)

वर्धा येथील न्यायालय कक्षात झालेल्या  महिला वकीलावरील हल्याच्या निषेध करीत डी बी ए तर्फे पायी मार्च काढून मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा  यांच्या न्यायालय कक्षात महिला वकीलावर आरोपी याने चाकू हल्ला केला होता यात महिला वकील गंभीर जखमी झाल्या आहे. जिल्हा व् सत्र् न्यायालय्, वर्धा येथे महिला वकील  सोबत घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध करण्याकरीता 24 मार्चच रोजी सुुुमारेे 250 ते 300 वकिलांनी डीबीएच्या नागपुर कार्यालयातून निघुन जिल्हाधिकारी कार्यालय नागपुर पर्यंत पैदल मार्च काढुन आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी व वकिल संरक्षण कायदा लागू करावा, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व बार् कौन्सिलच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्र्यांना जिल्हा वकील संघटना नागपुर च्या वतीने देण्यात आले

यावेळी जिल्हा वकील संघठनेचे अध्यक्ष एड.कमल सतुजा, महासचिव एड. नितिन देशमुख, बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे सदस्य एड. आसिफ कुरेशी, एड.सत्यनाथन , एड.पदमा चांदेकर, एड.रोशन बागडे, एड.अभय रनदीवे, एड.प्रकाश जैसवाल, एड.राजेश नायक, एड.उदय डबले, एड. अक्षय समर्थ, एड. प्रमोद उपाध्याय, एड.मनीष रनदीवे, एड.अनिल गुल्हाने, एड.कीर्तिकुमार कडू, एड. विनोद खोबरे, एड.शबाना खान, एड.चिंतामणि गायधने, एड.सौरभ राउत, एड.कैलाश वाघमारे, एड. आशीष शेंडे, एड.वासुदेव कापसे, एड. इब्राहिम बक्श, एड. तावीर शेख, एड. गजानन काले, एड. वासंती रिंके, एड. उषा गुजर, एड. शबाना दिवान, एड. स्मिता ताकसांडे एड.स्मिता गंगावाने चौधरी, एड. सुनीता पाल, एड. शैला कुरेशी, एड. अभिमन्यु समर्थ, एड. सौरभ पोद्दार, एड. भूपेंद्र सोने सह अनेक वकील  उपस्थित होऊन सहभागी झालेत।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here