गडचिरोली ला नवीन एअरपोर्ट तर अमरावतीला…..

0
16

महाराष्ट्र दिनांक 11 मार्च (प्रतिनिधी)

महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला.  त्यात आरोग्य, शेती, वाहतूक, उद्योग, महिला व बालविकास, अशा विविध विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, राज्यातील विमान वाहतुकीसाठीही (Transport budget 2022) काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

विमान वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या घोषणांमध्ये गडचिरोली, अमरावती,शिर्डी, रत्नागिरी, कोल्हापूर,  विमानतळाचा (Airport) समावेश आहे.

– अमरावती विमानतळावरून रात्रीची उड्डाणे, नवीन टर्मिनलची उभारणी आणि धावपट्टीचे रुंदीकरण यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

– गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारणीचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here