यंदा सरासरीच्या 103% पावसाचा अंदाज

0
11

२०२१ मध्ये सरासरीच्या १०३ टक्के (+/- ५ टक्के) पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सरासरीइतका पाऊस पडेल, असा अंदाज  ‘स्कायमेट वेदर’ या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे

स्कायमेटने जानेवारीमध्ये वर्तवलेल्या अंदाजामध्येही यंदा पाऊस सरसरीइतका पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्या संदर्भात मंगळवारी अधिक माहिती देण्यात आली. येत्या पावसाळ्यामध्ये देशाच्या उत्तर भागात काही ठिकाणी, तसेच ईशान्येकडे काही भागांत कमी पावसाची शक्यता आहे.

कोकणात सरासरीहून पाऊस कमी असू शकेल.

कर्नाटकाच्या अंतर्भागांमध्येही जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडू शकेल, अशी शक्यता आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि सप्टेंबरमध्ये देशातून माघार घेत असताना संपूर्ण देशात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महिनानिहाय पाऊसाचा अंदाज

– जून :सरासरीच्या १०६ टक्के

– जुलै : सरासरीच्या ९७ टक्के

– ऑगस्ट : सरासरीच्या ९९ टक्के

– सप्टेंबर : सरासरीच्या ११६ टक्के

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here