नागपूर शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रीय वयोश्री योजना आणि एडीपच्या लाथार्थ्यांसाठी नोंदणी सुरु होणार

0
12

नागपुर दिनांक 25 फरवरी (महानगर प्रतिनिधी)

नागपूर शहर आणि जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले .

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय वयोश्री योजना या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्य देशाच्या वरील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या दिव्यांग आणि वयाच्या 60 वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणाचे वितरण करण्यासाठी पात्र लाभार्थ्याची नोंदणी करण्यात येणार आहे .

नागरिकांच्या गरजेप्रमाणे त्यांना व्हीलचेअर , तीन चाकी , ब्रेल स्लेट , कॅलिपर्स वॉकिंग स् स्टीक ,क्रचेस ,चष्मे अशा 50 प्रकारच्या उपकरणांचा मोफत लाभ या योजनेतील पात्र ज्येष्ठांना देण्यात येणार आहे . दिव्यांग सहायता योजना ‘असिस्टंटन्स टू डिसेबल पर्सन ‘ – एडीप च्या अंतर्गत ज्या दिव्यांगांना 40 टक्के किंवा त्यातून त्याहून अधिक अपंगत्व आहे त्यांना सुद्धा अशा उपकरणांची मदत करण्यात येणार आहे . वयोश्री योजना आणि दिव्यांग सहायता योजनेच्या भावी लाभार्थ्यासाठी नोंदणी आणि मूल्यांकन शिबिरे तसेच उपकरण वितरण शिबिरे नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर आयोजित केले जाणार आहेत .

नागपूर शहरातील महानगरपालिका झोन कार्यालयांमध्ये 28 फेब्रुवारी पासून ते 20 मार्च 2022 पर्यंत सदर योजनेसाठी नोंदणीची प्रक्रिया चालू होणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली . नागपूर जिल्ह्यातही या योजनेसाठी नोंदणी चालू होणार आहे . राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी 60 वर्षे वयाच्या किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या वयाचा दाखला ,जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त मासिक उत्पन्न 15 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला ,आधार कार्ड आणि पासपोर्ट चे दोन फोटो सादर करणे आवश्यक आहे.

एडीआयपी अंतर्गत जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्यांकडून 40 टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र तसेच मासिक उत्पन्न 15 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहणार आहे . या लाभार्थ्यांची निवड करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले असून सरपंच ते खासदार अशा सर्व लोकप्रतिनिधी तसेच तलाठी ते जिल्हाधिकारी अशा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे या कामांमध्ये सहकार्य लागणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं .

मध्यप्रदेशातील उज्जैन मध्ये दिव्यांग पार्कच्या धर्तीवर नागपुरातसुद्धा ब्रेल लिपी ,इन डोर गेम ,ग्रंथालय अशा सुविधा असणारे दिव्यांग पार्क उभारण्यासाठी काही सेवाभावी संस्थाची मदत घेणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितलं .यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी , समाजकल्याण विभागाचे अधिकारी , स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते .

 

Koo App

केंद्रीय मंत्री श्री @nitin.gadkari जी यांनी नागपूर शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना अनुक्रमे ‘राष्ट्रीय वयोश्री योजना-२०२१’ आणि ‘दिव्यांग सहायता योजना’ (अडिप – असिस्टन्स टू डिसेबल्ड पर्सन्स) या योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी व प्रशासनाला सहकार्याचे आवाहन केले.

Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) 25 Feb 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here