राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआय) समन्स पाठवलं आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची 14 एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर त्यांची 14 एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकांची सीबीआयकडून रविवारी चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनाही सीबीआयनं समन्स पाठवले आहे
सीबीआयच्या तपास पथकाकडून रविवारी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व साहाय्यक एस.कुंदन यांची कसून चौकशी केली होती. सुमारे चार तास त्यांचा स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.






