श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कत्त्लखाने  व मांस विक्रीचे दुकाने बंद

0
13

नागपूर 15 फेब्रुवारी (प्रतिनिधी)

“श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती” (तारखेनुसार) दिनानिमित्त शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी, २०२२ ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक ०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराव क्र.२४० दिनांक ०२/०७/२०१८ अन्वये मा.आयुक्त यांचे दिनांक ०३/०८/२०१८ चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे.

त्यानुसार शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ ला “श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती” (तारखेनुसार) दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हददीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील.

जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन  यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here