रोख व्यवहार नियम पाळा नाही तर येईल इनकम टैक्सची नोटिस

0
15

जाणून घ्या काय आहेत रोखीबाबतचे नवे नियम

2000 रुपयांपेक्षा जास्तीचे दान रोख पैसे देऊन देता येणार नाही.

5000 रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहारात वैद्यकीय खर्चावर आयकरात सूट मिळणार नाही.

10 हजार रुपयांपेक्षा जास्त व्यावसायिक खर्च रोखीत केल्यास ही रक्कम आपल्या नफ्यात धरली जाईल.

20 हजार रुपयांपेक्षा जास्त कर्ज रोख रकमेत देता किंवा घेता येणार नाही. हा नियम तोडल्यास दंड भरावा लागेल.

50 हजार रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम परदेशी चलन कार्यालयात बदलून घेता येणार नाही.

2 लाख रुपयांपेक्षा जास्तीची कोणतीही खरेदी रोखीत करता येणार नाही.

बँकेतून 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख बँकेतून काढल्यास टीडीएस लागू होईल.

जाणून घ्या घरात किती रोख ठेवता येणार

कर तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार घरी ठेवण्याच्या रोखीवर अद्याप कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र घरात असलेल्या रोखीचा स्रोत सांगणे बंधनकारक आहे. जर याची माहिती देता आली नाही तर त्याच्यावर 137%  दंड लागू होऊ शकतो.

बँकेतील बचत खात्यांबद्दलही निश्चित झाले काही नियम

एकाच वेळी 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम आपण जमा केली किंवा आपल्या बचत खात्यातून 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख जमा केली तर आपल्याला आपला पॅनकार्ड क्रमांक द्यावा लागेल. रोख देऊन पे-ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट आपण तयार करत असाल तर पे-ऑर्डर-डीडी करतानाही आपल्याला पॅन क्रमांक द्यावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here