नागपूर दिनांक 3 डिसेंबर (प्रतिनिधी )
मारवाडी युवा मंच नागपूर शाखा यांची 2021ते 2023 या कालावधीकरिता नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यांचा पदग्रहण सोहळा माजी मंत्री तथा अखिल भारतीय मारवाडी संमेलनाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेशचंद्र बंग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून शपथविधी अधिकारी म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मांचाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पंचांरिया तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे संघटन मंत्री वीरेंद्रप्रकाश धोका, महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे प्रदेश महामंत्री निकेश गुप्ता, व महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज अग्रवाल यांच्या उपस्थित आज एम.आय.ए क्लब एम. आय. डी. सी. हिंगणा वाडी रोड येथे सायंकाळी 6.30 वाजता संपन्न होणार आहे.
या पदग्रहण सोहळ्याला समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन मारवाडी युवा मांचाचे विदर्भ प्रमुख महेश बंग, अध्यक्ष राजेश अग्रवाल, माजी अध्यक्ष अजय मल, निशांत गांधी, गोपाल मेहाडिया, संजय पालीवाल, सुधीर बाहेती, अतुल कोटेचा, सुरेश अग्रवाल, शरद खंडेलवाल अनिल मंत्री, व शरद राठी यांनी केले आहे.






