पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. त्यानंतर आता त्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री बॅनर्जी या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. १ डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री बॅनर्जी मुंबईतच राहणार आहेत. (west bengal cm mamata banerjee will meet cm uddhav thackeray and ncp chief sharad pawar in mumbai)
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांचे काँग्रेससोबतचे संबंध चांगले राहिलेले नाहीत. सध्या त्या पक्षाच्या विस्तारात व्यग्र असून त्या काँग्रेस नेत्यांपासून मात्र दूर जात असल्याचे चित्र आहे. गेल्या दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, मात्र या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतलेली नाही हे विशेष. सध्या आपण पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूपच व्यग्र असल्याने सोनिया गांधी यांची भेट घेतली नसल्याचे त्या म्हणाल्या. सोनियांबद्दल वारंवार विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर त्या चांगल्याच भडकल्या आणि उत्तर देणे त्यांनी टाळले.
खरं म्हणजे मुख्यमंत्री बॅनर्जी या बंगाल ग्लोबल बिझनेस समीटसाठी ३० नोव्हेंबरला मुंबईत येणार आहेत. त्या ३० आणि १ नोव्हेंबर असे दोन दिवस मुंबईत असतील. या दरम्यान त्या मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याबरोबरच, त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.






