पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पंढरपूर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या ८ प्रकल्पांच्या भूमिपूजनासह इतर ५ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह , महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व अनेक साधू-संत उपस्थिती होते
शतकानुशतके चालत आलेल्या महाराष्ट्राच्या वारी परंपरेला चालना देण्यासाठी ६,६९३ कोटी आणि ४,४१५ कोटी रुपये किंमतीच्या या प्रस्तावित पालखी मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वारकऱ्यांच्या सोयीसाठी दोन पदरी रस्त्यांचे चार पदरी रुंदीकरण आणि स्वतंत्र पालखी मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे तीर्थक्षेत्राचे पर्यटन वाढेल तसेच स्थानिक लोकांसाठी नवीन उद्योग व रोजगार निर्माण होतील.
यासोबतच, आज मोदीनी १,१८६ कोटी रुपये किंमतीचे पंढरपूरला जोडणारे २२३ किमी लांबीचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आहेत. हे महामार्ग पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील बागायत क्षेत्रातील साखर कारखान्यांना सेवा देतील आणि नाशवंत कृषी साहित्याच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना सोईस्कर ठरतील






