नागपूर दि. 27 ऑक्टोबर (महानगर प्रतिनिधी)
दि धरमपेठ महिला सोसायटीने खातेदाराचे हित लक्षात घेता नवीन धोरणा मध्ये बदल केला आहे. महत्वाचे “व्याजदर कमी पैशाची हमी” ह्या योजनेअंतर्गत खातेदार सभासदांचे हित जोपासण्याचा संकल्प केला आहे. संस्थेचा मुख्य आधार महिला जेष्ठ नागरिक असुन एक लाखांच्या वर सभासद संख्या पोहचली आहे. आज एक पून्हा मानाचा तुरा रोवण्यात येत आहे.
जनसामान्यांचा विश्वास संपादन करणारी “आपला परिवार, आपली संस्था” है ब्रीद वाक्य असलेली दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट को ऑप सोसायटी मर्या नागपूर या संस्थेचे 27 वे वर्ष सुरु असून संस्थेला एम. एस.ई.डी. सी. एल से 27 मे अधिकृत विज बिल भरणा केंद्र मानकापूर शाखेला मिळालेले आहे.
त्या केंद्राचे उद्घाटन दि. 28/10/2021 रोज गुरुवारला दुपारी 12.30 वाजता राजेश घाटोळे, कार्यकारी अभियंता, सिवील लाईन्स विभाग, नागपूर यांच्या हस्ते होणार असून सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलिमा बावणे उपस्थित राहणार आहेत.
संस्थेने यशस्वीरित्या विश्वासाचे 27 वर्ष पूर्ण केलेले असून सभासद, खातेदार हितचिंतकाचे अमुल्य सहकार्य व आशिर्वादामुळे 2100 कोटींच्या वरचा व्यवसाय पूर्ण केलेला आहे. संस्थेच्या 27 शाखा कार्यरत असून 26 शाखेत M.S.D.C.L से अधिकृत विज बिल भरणा केंद्र सुरु आहेत तसेच मानकापूर शाखेतील हे 27 वे केंद्र सुरु होत आहे.
संस्थेला सुरुवातीपासून ऑडीट वर्ग “अ” मिळाला आहे. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये लॉकर्स सुविधा आहे. संस्थेत RTGS व NEFT ची सेवा उपलब्ध आहे. संस्था व LIC Insurance Business Partner आहे. जनरल इन्शुरन्सची सेवा उपलब्ध आहे. 12 वी व पदवीधर विद्याथ्र्यांकरीता Banking Training ये वर्ग सुरु केलेले आहेत.
ही माहिती देण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलिमा बावणे, उपाध्यक्षा सौ. सारिक पेंडसे, संचालिका सौ. अनघा मुळे, निलम बोवाडे, श्रध्दा पुरोहित, छाया शुक्ला,अंजली राउत, साधना रक्षमवार, मुख्य व्यवस्थापक चंद्रशेखर वसुले तसेच मुख्यालयातील अधिकारी उपस्थित होते.







