नागपूर, ता. ३० : शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील हत्तीरोगाचे प्रमाण किती प्रमाणात कमी झाले याची शहानिशा करण्यासाठी हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण करण्यात आले. २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान शहरातील निवड झालेल्या वस्त्यांमध्ये ६ ते ७ वर्ष वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. जास्तीत जास्त मुलांचे सर्वेक्षण व्हावे या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी १ ऑक्टोबर रोजी सर्वेक्षणाची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. काही निवडक वस्त्यांमध्ये ही विशेष मोहिम राबविली जाणार असून नागरिकांनी त्यांच्या वस्तीमध्ये सर्वेक्षणास येणाऱ्या मनपाच्या चमूला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी केले आहे.
हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षणाअंतर्गत धरमपेठ झोनमधील मनोहर विहार कॉलनी पोस्टल कॉलनी, भरत नगर, मरियम नगर, हनुमान नगर झोनमधील महेश कॉलनी, मुद्रा नगर, धंतोली झोनमधील राजाराम सोसायटी कचोरे पाटील, नेहरूनगर झोनमधील ऑरेंज नगर, लता मंगेशकर नगर, घर संसार सोसायटी, माता नगर, न्यू नंदनवन, बाहुबली नगर, पवनसुत नगर, सेनापती नगर, छोटा ताजबाग, आशीर्वाद नगर, राजीव गांधी नगर, भांडेप्लॉट, गांधीबाग झोनमधील गांधी पुतळा, रामाजीची वाडी, मस्कत होंडा, लाडपुरा, लकडगंज झोनमधील लक्ष्मीनगर, ओमसाई नगर, कुंभारटोली चौक, जयभीम चौक, शितला मंदिर, आशीनगर झोनमधील विश्वदीप बौध्द विहार, दयानंद नगर, बाळाभाऊ पेठ, इंदोरा झोपडपट्टी, मंगळवारी झोनमधील स्टारकिस टॉउन, नेहरू कॉलनी या वस्त्यांमध्ये सर्वेक्षणाची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.






