1 ऑक्टोबरला ज्वाला धोटे यांचे गंगा-जमुना येथे धरणे आंदोलन

0
9

नागपूर दिनांक 29 सप्टेंबर प्रतिनिधी : नागपुरातील सर्वात मोठे रेड लाइट एरिया गंगा जमुना मागील एक महिन्यापासून विशेष चर्चेत आहे, पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी येथे अचानक संचारबंदी लावून रस्ते सील केले होते त्या विरोधात स्थानिक राकाँ महिला नेत्या ज्वाला धोटे यांनी दंड थोपटले होते

पोलीस कमिशनर यांनी गंगा-जमुनात अचानक लावलेले संचारबंदी अखेर उठवली व रस्ते खुले केले मात्र येथे देहव्यापार करण्यास प्रतिबंध करण्यात आले व पोलिसांचे येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आले आहे

आज ज्वाला धोटे यांनी या परिसराचा दौरा करून तेथील वारांगणाची भेट घेतली असता त्यांनी पोलीस कमिशनर विशिष्ट हेतूने कार्य करीत असल्याचे धोटे यांना सांगितले

या भेटीनंतर ज्वाला धोटे यांनी एक ऑक्टोबरला गंगा जमुना परिसरात पोलीस आयुक्तांच्या या कार्याचा निषेध म्हणून दोन तासाचे धरणे आंदोलन गंगा-जमना परिसरात करण्याचे ठरविले ज्वाला यांच्या या निर्णयाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला असून त्यांचा सहभाग या धरणे आंदोलनात राहणार असल्याची माहिती  विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here