नागपूर 28 सप्टेंबर (विशेष प्रतिनिधी)
दूरदर्शनच्या नागपूर केंद्राच्या टेरेस्ट्रियल बँड 3 वाहिनी क्रमांक 7 वरचे डीडी सह्याद्रीचे प्रक्षेपण 31 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. मात्र या वाहिन्या दूरदर्शन डीडी फ्री डिश डीटीएच सेवेवर उपलब्ध राहणार असून सेट टॉप बॉक्स, डिश अँटेना स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी जवळच्या दूरदर्शन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे किंवा www.ddindia.gov.in संकेस्थळास भेट देण्याचे आवाहन नागपूर दूरदर्शन केंद्राद्वारे करण्यात आले आहे.
प्रसार भारती मंडळ तसेच दूरदर्शन महासंचालनालय, नवी दिल्लीच्या आदेशानुसार या क्षेत्रीय प्रक्षेपण सेवा बंद करण्यात आल्याचे नागपूर दूरदर्शन केंद्राचे अभियांत्रिकी उपसंचालक भुपेंद्र तुरकर यांनी कळवले आहे






