नागपूर दि. 23 –लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी उदया शुक्रवार 24 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय अधिकारी ,कर्मचारी व त्यांचे कुटुंबियाकरीता विशेष लसीकरण शिबीराचे आयोजन बचतभवन येथे करण्यात आले आहे.तरी ज्यांचे लसीकरण प्रलंबित आहे अश्या सर्व शासकीय अधिकारी ,कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला.आर यांनी केले आहे.
जिल्हा कोविड टास्क फोर्सच्या सूचनेनुसार शासकीय कार्यालयात देखील लसीकरण मोहीम वेगवान झाली आहे. त्याच्या पहील्या टप्प्यात 17 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेत 61 अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.त्यांचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात उदया लसीकरण करण्यात येईल.
गेल्या मंगळवारी महिला विशेष लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सूचविल्याप्रमाणे 330 केंद्राद्वारे महिलांची विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती. नागपूर शहरात 19 सप्टेंबरपर्यंत 19 लाख 11 हजार लोकांचे लसीकरण झालेले आहेत. यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 13 लक्ष 13 हजार तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 5 लक्ष 97 हजार एवढी आहे.
नागपूर ग्रामीण भागात 19 सप्टेंबरपर्यंत तालुका निहाय भिवापूर- 58 हजार 506, हिंगणा- 1 लक्ष 56 हजार 432, कळमेश्वर- 99 हजार 955, कामठी- 1 लक्ष 50 हजार 97, काटोल- 1 लक्ष 7 हजार 156, कुही- 65 हजार 694, मौदा- 87 हजार 607, नागपूर ग्रामीण- 1 लक्ष 65 हजार 576, नरखेड- 96 हजार 7, पारशिवनी 91 हजार 742, रामटेक- 76 हजार 621 सावनेर- 1 लक्ष 51 हजार 206, उमरेड- 1 लक्ष 39 हजार 911 एकूण 14 लक्ष 46 हजार 510 नागरिकांचे लसीकरण झाले होते.
काल दिनांक 22 सप्टेंबर रोजी 16 रूग्ण आढळले आहे. नागरिकांनी कोविड सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.






