३१ डिसेंबरपूर्वी मालमत्ता कर भरल्यास ५ टक्के सवलत

0
11

नागपूर, ता. ११ : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी मनपाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. ३० जून २०२१ च्या नंतर व ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी मालमत्ता कर भरणा-यांना करामध्ये ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या कलम १४० अन्वये मालमत्ता करामध्ये ५ टक्के सवलतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये शासनाच्या वतीने वसूल करण्यात येणा-या कराची रक्कम समाविष्ट नाही. ही सवलत फक्त ३१ डिसेंबर पर्यंत असून जास्तीत जास्त नागरिकांनी मनपाच्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here