नागपूर, ता.२८ : नागपूर महानगरपालिकेकडे कोव्हीशिल्ड लसीचासाठा कमी प्रमाणात शिल्लक असल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केन्द्रांवर गुरुवारी (२९ जुलै) रोजी ४५ वर्षावरील सर्व वयोगटातील नागरिकांचे मर्यादित स्वरुपात लसीकरण होणार आहे, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
तसेच १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दूसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.






