पंढरपुरात आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. पंरपरेला अनुसरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक आज पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी महापूजा केली. यावेळी वर्धेचे मानकरी दांपत्य विठ्ठल मंदिरातील विणेकर शिवदास सोलते आणि इंदुबाई कोलते पूजेत सहभागी झाले
करोना संसर्गामुळं मोजक्या लोकांच्या उपस्थितित महापूजा पार पडली. यावेळी विठुरायाच्या गाभाऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पडली.
यापूर्वी सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः 8 तास गाडी चालवून प्रंचंड पावसात मुंबईहून पंढरपूरला दाखल झाले होते





