आजपासून ‘घरोघरी कुष्ठ व क्षयरोग शोध’ मोहीम

0
10

नागपूर दिनांक 12 सप्टेंबर ( महानगर प्रतिनिधी )

कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे उद्यापासून 30 सप्टेंबर पर्यंत या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरोघरी कृष्ठ व क्षयरोग रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे.

सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या चमू व पथकाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. माधुरी थोरात यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील जोखीमच्या क्षेत्राकरीता तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका, क्षेत्रीय स्तरावरील आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक रोज 30-40 घरांना भेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेतील.

जिल्ह्यातील नागरिकांची, जोखिमग्रस्त लोकसंख्या असणा-या भागांमध्ये रोगशास्त्रीय अभ्यासानुसार कृष्ठ व क्षय आजाराचे रुग्ण निदान व औषधोपचारापासुन वंचित राहील्यास रुग्णाला या रोगापासून निर्माण होणा-या गुंतागुंतीचा सामना तर करावाच लागतो. त्याचप्रमाणे त्याच्या सहवासातील इतर लोकांनासुध्दा या आजारांचा धोका संभवतो.

मोहीम अतिजोखिमग्रस्त लोकसंख्येत झोपडपटटी, विटाभटटी, भटक्या जमाती, कामासाठी स्थलांतरीत तसेच खाणीमध्ये काम करणारे कामगार तसेच तुरुंग, वृध्दाश्रम, आश्रमशाळा व वस्तीगृह, आदीवासी मुलांचे वसतीगृह, मनोरुग्णालय आदी ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here